सांगोला (Sangola) येथील शिवसेना पक्षाचे (Shiv Sena) माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. प्रसारमाध्यांमध्ये चर्चेत कसे राहायचे, लोकांमध्ये आपले आकर्षण कसे निर्माण करायचे, याबाबत या गृहस्थांचा हातकंडा. आताही ते चर्चेत आहेत. कोणत्या वक्तव्याने नव्हे, तर आपल्या कृतीने. त्यांनी स्वत:च आपल्या आताने आपल्या थोबाडीत (Slapped Himself) मारुन घेतले आहे. त्यांच्या या कृतीचीही प्रसारमाध्यामातून चांगलीच चर्चा होत आहे. काय ते डंगार.. काय ती झाडी.. सगळं कसं एकदम ओके, असं म्हणता म्हणता भर सभेत, जाहीर व्यासपीठावरुन त्यांनी स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच थोबाडीत का मारुन घ्यावी? असा सवाल जनतेला पडला आहे .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेना आमदारांनी सूरत मार्गे गुवाहाटी गाठली होती. त्या आमदारांमध्ये त्यामध्ये सांगोलाचे शहाजी बापू पाटील यांचाही समावेश होता. गुवाहाटी येथीलच एका हॉटेलमधून आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी 'काय झाडी.. काय डोंगर.. काय हाटेल..एकदम ओके', असे उद्गार काढले आणि आजच्या डिजिटल युगात ते प्रचंड व्हायरलसुद्धा झाले. त्या वेळी ते त्यांच्या प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर आले होते. त्यांना निवडणूक प्रचारामध्येही जोरादर मागणी होती. पण, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांचा दणकून पराभव झाला. त्यामुळे ते काहीसे माध्यमांच्या नजरेतून बाजूला फेकले गेले. दरम्यान, आता ते स्वत:च्याच थोबाडीत मारुन घेण्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
टाइम्स स्पेशल
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.