loader
Breaking News
Breaking News
Foto

मंत्री उदय सामंत म्हणतात, 'उपमुख्यमंत्री शिंदेंची परवानगी घेऊनच राज ठाकरे यांना भेटलो

शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे या दोन्ही नेत्यांमध्ये भेट आली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांची चर्चा असतानाच या दोन नेत्यांच्या भेटीने चर्चेला उधाण आलं होतं. मात्र मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या भेटीचे कारण उघड केले आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी या भेटीचे कारण स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, 'आज मराठीच्या संदर्भात ज्या घडामोडी चालू आहेत. त्यांसंदर्भात राज ठाकरेंनी मला भेटायला बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊन आलो होतो. महत्त्वाचा मुद्दा असा की, महाराष्ट्रात ज्या काही संस्था आहेत. बँका आहेत त्यात मराठीच्या बाबतीत निर्णय घेतला जातो. किंवा तिथे ज्या काही गोष्टी घडतात. त्याचा प्रतिबंध कसा करायचा. त्या संदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत. त्यासंदर्भात मी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांशी बोलणार असून त्यात काय सुधारणा करता येतील त्या दृष्टीने निर्णय घेऊ', असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

राज ठाकरेंच्या भेटीचे कारण काय?

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg