loader
Breaking News
Breaking News
Foto

ओम साई चषक समर्थ फायटर राजा भारत ग्रुपने पटकावला

मकरंद सुर्वे (संगमेश्वर) : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे ओम साई क्रीडामंडळ चोबार वाडीच्यावतीने सुरज फडकले यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या नाइट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत समर्थ फायटर राजाभारत ग्रुप संघाने विजेते पद मिळवले तर उपविजेतेपदाचा मान संघ राघव फायटर संघाने मिळवला. मालिकावीर आणि उत्कृष्ठ फलंदाज किरण मापाले तर उत्कृष्ठ गोलंदाज योगेश तुळसणकर याला देण्यात आला. तुरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी कामगार सेनेचे राज्यसरचिटणीस शेखर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, कॉन्स्टेबल अनिकेत चव्हाण, सोमनाथ खाडे, वाडीप्रमुख रघुनाथ येलोंडे, नंदकुमार फडकले, शांताराम बामणे, देवकू फडकले, कृष्णा पाचकले, शांताराम हरेकर, शांताराम येलोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचा अंतिम सामना समर्थ फायटर राजा भारत ग्रुप व राघव फायटर यांच्यामध्ये खेळवण्यात आला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात समर्थ फायटर विजेता तर राघव फायटर उपविजेता ठरला. विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर आणि उत्कृष्ठ फलंदाज किरण मापाले तर उत्कृष्ठ गोलंदाज योगेश तुळसणकर याला देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg