loader
Breaking News
Breaking News
Foto

नदीवर बंधारे बांधण्याची मोहिम जिल्ह्यात मागे का पडली?

रत्नागिरी (टाइम्स न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्यात पश्‍चिममुखी वाहणार्‍या नद्यांवर व छोट्या पर्‍हांवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावू नये म्हणून जिल्हापरिषदेतर्फे दरवर्षी ग्रामपंचायतींना तात्पुरते बंधारे बांधण्याची सूचना केली जाते. यंदाही अशा प्रकारच्या सूचना ग्रामपंचायतींपर्यंत पोहचून देखील अनेक ग्रामपंचायतींनी याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता अधिक भेडसावणार असल्याचे जनतेतून म्हटले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नद्यांवर बांधण्यात येणारे रेती व मातीचे बंधारे स्थानिक जनतेला खूप उपयोगी ठरतात. त्यामुळे विहीरींना पाण्याचा निचरा होतो व कपडे ही धुण्याची सोय होते. तसेच वन्य प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची सोय होते. अशा उपयुक्त धरणांना बांधण्याची काळजी ग्रामपंचायतींनी घेतलेली नाही. कारण जलसंधारण विभागाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. ज्या ग्रामपंचायतींनी अशी धरणे बांधलेली नाहीत, त्यांना त्याचा जाब विचारण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. अजूनही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ग्रामपंचायती असे बंधारे बांधू शकतात. उशिरा का होईना पण पाणी साचेल आणि लोकांना त्याचा उपयोग होईल, असेही म्हटले जात आहे.

टाइम्स स्पेशल

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना श्रमदानातून बंधारे बांधण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी ग्रामीण जनतेतून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg