loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका बेलदार समाज आयोजित क्रिकेट स्पर्धेला शानदार सुरुवात

वरवेली (गणेश किर्वे) : गुहागर तालुका बेलदार समाज आयोजित महाराष्ट्र राज्य, गुजरात व गोवा राज्य मर्यादित ओपन ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेला श्रृंगारतळी बाजारपेठ गोल्डन पार्क मैदान येथे शानदार सुरुवात झाली आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, उद्योजक गुलामशेठ तांडेल, विष्णुपंत पवार, मेमोरियल हॉस्पिटल शृंगारतळीचे डॉ. राजेंद्र पवार, वर्षाताई पवार, सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, सदस्य सिद्धी जाधव, शेखर पवार, उद्योजक अरुण गांधी, अमिष कदम, आयोजक नरेश पवार, माजी सरपंच संजय पवार, विनोद पवार, बाळा जाधव, किरण गडदे, राम पवार, किसन पवार, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यातील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहे. या स्पर्धेमध्ये गुहागर रॉयल, प्रदीप इलेव्हन खंडाळा, जानाई निसराळे, खामशेत पुणे, डिंगडॉंग जाधव वाडी, हनुमान नगर पोलादपूर, अनिल इलेव्हन डोंबीवली, महाराणा प्रताप माणगाव, योद्धा खादगुण, लक्ष्मी नगर आयरे, गुहागर व चिपळूण, फिरंगाई देवी खेड व चिपळूण, जानाई देवी दापोली मंडणगड, पालघर, गोवा गोवा वारीस वॉरियर्स, कर्जत खालापूर, दिव्या इलेव्हन उरण पनवेल, कृष्णा कार्तिक इलेव्हन इंदापूर, गुजरात अवा व वेरा, कोरेगाव वाई हे संघ सहभागी होणार आहेत.

टाइम्स स्पेशल

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास १ लाख रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास ५० हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकास २५ हजार रूपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकास १० हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयोजक नरेश तात्याबा पवार, विनोद राम पवार, माजी सरपंच संजय तात्याबा पवार, बाळा जाधव, सागर मोहिते तसेच गुहागर तालुका बेलदार समाजातील सर्व समाज बांधव मेहनत घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg