loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील रिक्षाचालकाकडून गांजासदृश अंमली पदार्थ जप्त

रत्नागिरी (वार्ताहर) - रत्नागिरी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री विरोधी कारवाई हाती घेतली आहे. या कारवाई अंतर्गत गुरुवारी तालुक्यातील मिरजोळे येथे कारवाई करण्यात आली. एका रिक्षा चालकाकडून गांजासदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, नितीन ढेरे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार केली. त्यांच्या मार्फत महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालण्याबाबत अधिक सूचना दिल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक ३ एप्रिल रोजी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे रत्नागिरी शहर परिसरात गस्त घालत असताना मिरजोळे-नाचणकर चाळ, रत्नागिरी परिसरामध्ये एका रिक्षा चालकाच्या संशयित हालचालीवरून त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा इसम हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी लक्ष्मण रवी नायर (वय ३४ वर्ष रा. नाचणकर चाळ मिरजोळे ता.जि. रत्नागिरी) असल्याचे निष्पन्न झाले. या पथकाने त्याच्या ताब्यातील पिशवी, पंचांसमक्ष तपासून खात्री केली असता त्यामध्ये ४७७ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपी लक्ष्मण रवी नायर (वय ३४ वर्ष रा. नाचणकर चाळ मिरजोळे ता.जि. रत्नागिरी) याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२९/२०२५ एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८(क), २२(अ), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टाइम्स स्पेशल

संशयित आरोपी लक्ष्मण रवी नायर याच्याकडून ४७७ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ व एक ऑटो रिक्षा असा मिळून एकूण १,७०,०००/- हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg