loader
Breaking News
Breaking News
Foto

उच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे आता रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष, 16 एप्रिलपर्यंत स्थगिती

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना काल घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळाली. शहरानजिक असणार्‍या भाट्ये समुद्रकिनारी रत्नसागर बीच रिसॉर्ट हॉटेलसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भाडेतत्वावर जागा दिली होती. सदरची जागा शासनाने पुन्हा ताब्यात घेतली. त्यामुळे रत्नसागर रिसॉर्ट लिमिटेड या खासगी उद्योजकाला 10 वर्षाच्या करारावर दिलेल्या नियमांचा भंग झाला. त्यावरुन वाद होवून प्रकरण लवाद न्यायाधिकरणापर्यंत पोहोचले. लवादाने 9 कोटी 25 लाख रुपये जिल्हा प्रशासनाने द्यावे, किंवा त्यांच्या कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करावी असे आदेश दिले. आदेश लागू झाल्याने न्यायालयाचे बेलिफ येवून त्यांनी कारवाई सुरु केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा न्यायालयाने या कारवाईस 16 एप्रिल 2025 पर्यंत स्थगिती दिली आहे. आता उभय पक्ष उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 2021 मध्ये रत्नसागर बीच रिसॉर्टसाठी भाट्ये समुद्रकिनार्‍यावर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg