केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : रस्त्याचे काम सुरू असून रस्ता पूर्ण होण्याआधीच मार्गावरून बिनधास्तपणे चिरे वाहतूक करणार्या दहा ते बारा अवजड ट्रकांना अडवून धरत नागरिकांनी वाहतूक रोखून धरल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान लांजा तालुक्यातील आसगे येथे घडली. नागरिकांशी अरेरावी करणार्या ट्रक चालकांना नागरिकांनी चांगलीच ताकीद दिली. ट्रक अडवून धरल्याने आसगे येथे चिरेवाहू ट्रकांची लांबलचक रांग पहायला मिळाली. काहीकाळ झालेल्या बाचाबाचीमुळे वातावरण वादाचे बनले असताना मात्र नागरिकांनी आपला राग शांत करत ट्रक चालकांना समज देऊन सोडून दिले.
लांजा तालुका कोल्हापूर जिल्ह्याला जोडलेल्या आसगे-तळवडे-कुरचुंब-साखरपा मार्गावर सतत अवजड वाहनांची वर्दळ असल्मयाने रस्त्यांची खूपच दुरावस्था झाली आहे अवजड वाहनांची वाहतूक करण्याच्या क्षमतेचा रस्ता नाही. रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली असुन सदर रस्त्याचा सर्वे झाला असल्याने अद्याप कोणतीही कार्यवाही नसल्याची नाराजी जनतेतून केली जात आहे. तसेच अवजड चिरेवाहू ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या मार्गावरील अवजड चिरे वाहतूक बंद करून वाहतूक पाली मार्गे वळविण्याच्या सूचना तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा राजरोसपणे चिरे वाहतुक करणार्या सोळाचाकी अवजड ट्रकांची वाहतूक सुरू झाल्याने देवधे, आसगे, तळवडे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवधे व आसगे येथील नागरिकांनी क्षमतेपेक्षा जास्त चिरे वाहतूक करणारे तब्बल 12 ट्रक गुरुवारी रात्री अडवून धरले होते. यावेळी नागरिक व ट्रक चालक यांच्यामध्ये शाब्दिक जोरदार बाचाबाची झाली.
लांजा तालुक्यातील जांभा चिरा प्रसिद्ध असून रत्नागिरी जिल्ह्यासह, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील काही भागांमध्ये जांभा जाऊन पोहचला आहे. त्यामुळे लांजा तालुका जांभा चिर्यांच्या खाणी लक्षवेधी ठरत आहे. लांजा तालुक्यातील चिर्यांना मागणी वाढली आहे. यामधून शासनाला, खाण मालकांना महसूलही चांगला प्राप्त होतो आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गला जोडलेल्या देवधे-आसगे मार्गाचे सद्या रुंदीकरणाचे काम प्रगती पथाकडे असून काम पूर्ण होण्याआधीच या मार्गावरून बिंधास्तपणे चिरेवाहू अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. या अवजड वाहतुकीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे लांजा-आसगे-तळवडे-कुरचुंब मार्गानेही जांभा चिरा वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील दोन्ही मार्गाने परजिल्ह्यात चिरे वाहतूक सुरू आहे. रस्त्याचे काम सुरु असल्याने देवधे- आसगे मार्गावरून सुरू असणारी अवजड वाहतूक तत्काळ बंद करावी अशी मागणी देवधे, आसगे ग्रामस्थांनी केली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.