loader
Breaking News
Breaking News
Foto

खोपी ते कुळवंडी रस्त्याची दुरावस्था, ठेकेदाराने सोडले अर्धवट काम?

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड ते खोपी रस्त्याची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. सन २०२३ / २०२४ मध्ये सदर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून मे २०२४ रोजी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कामाचा ठेका एका कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले परंतु काम चालू झाल्यानंतर आजपर्यंत ११ महिने झाले तरी काम कोणत्याही मार्गाने पूर्ण झालेले दिसून येत नाही. या सगळ्या प्रकारावरती सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड का दुर्लक्ष करत आहे हे कळू शकलेले नाही. सदर रस्त्याला अवकाळी पडलेल्या पावसामुळे तळ्याचे स्वरूप आलेले दिसून येत आहे. या रस्त्याच्या कामामुळे वाहन चालक व प्रवासी दोन्ही संभ्रमात पडले असून रस्त्याचे कामकाज केव्हा पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg