loader
Breaking News
Breaking News
Foto

एका माजी महिला सरपंचाने प्रेताला दिला खांदा, अंत्यविधीसाठी घेतला पुढाकार

संगमेश्वर (एजाज पटेल) : ऐन शिमग्याच्या धामधुमीत गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या भक्त गणांच्या भेटीला त्यांच्या स्वगृही येतात. अशा काळात एखाद्या कुटुंबात कुणाला देवाज्ञा झाली तर ....ती गैरसोय होऊ शकते. असाच काहीसा बाका प्रसंग विघ्रवली गावातील हर्डीकर कुटुंबीयांवर आला. त्यांनी जवळपासच्या सर्व लोकांना या घटनेची माहिती दिली. तशीच माहिती काटवली ढोसळवाडी येथील लोकांपर्यंत त्या कुटूंबाने दिली. कारण ही लोकवस्ती हाकेच्या अंतरावर आणि अगदी नदिपलीकडे आहे.परंतु देवाच्या पालखीचे शिंपनं सुरू होते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लोक उशीरा पोहोचतील असे त्या कुटुंबाला कळविण्यात आले. या कुटुंबाची अथवा उपस्थित नातेवाईक यांची संख्या पुरेशी नव्हती की या मृतदेहाचे अंत्यसंस्कार पुढाकाराने पुर्ण करता आले असते.अशा विपरीत परिस्थितीत विघ्रवली गावातील माजी महिला सरपंच सौ.संपदा भुरवणे यांनी उचललेले पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. उशीरापर्यंत प्रेत ठेवणे योग्य नसल्याने काही गावकरी आणि कुटुंबीयांना सोबत घेऊन संपदा भुरवणे यांनी अन्य पुरुष मंडळींसोबत अंत्यसंस्काराची तजवीज सुरू केली. चक्क प्रेताला खांदा देणे नव्हे तर सरणासाठी लाकडे आणणे ही कामे त्यांनी केली. सौ. संपदा भुरवणे या काटवली ढोसळवाडी येथील माहेरवाशीण, एक आदर्शवत कृती करुन संपदा भुरवणे यांनी इतर महिलांना आणि कर्मठ व्यवस्थेला बोध घ्यायला भाग पाडले आहे.सौ.संपदा भुरवणे या पंचक्रोशीतील माघी गणरायाची निस्सीम भक्त आहे. त्यांनी केलेली कृती प्रशंसनीय आहे. पंचक्रोशीतील सर्व समान थोरांना तिचा अभिमान वाटतो आहे. इतरांच्या दुःखात सहभागी होताना, चाकोरीबाहेर पाऊल टाकण्याचे धाडस क्वचित काही लोक करतात. काही गोष्टी म्हणजे भ्रामक कल्पना पण याला आव्हान देणे लोक टाळतात. जर तेच आव्हान कुणी लिलया पेलले तर लोक प्रशंसा करतात,टाळ्या वाजवून प्रशंसा करतात. समाजात बदल घडतो आहे. त्या बदलाचा आपण जर का भाग बनलो तरच सशक्त विचारांचा समाज निर्माण होईल.भ्रामक कल्पनांचा भोपळा फुटेल. चांगली कृती केली अथवा त्या कृतींचे समर्थन जरी केले तरी हा मनुष्य जन्म भरून पावेल!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg