loader
Breaking News
Breaking News
Foto

बापरे, सरकारची नामुष्की? कलेक्टरांचे केबीनवरच जप्तीची आफत

रत्नागिरी : रत्नागिरीतील खुद्द जिल्हाधिकार्‍यांच्या केबीनवरच जप्तीची आफत ओढवली आणि मग मुंबईपासून कोकणात सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. रत्नागिरी भाट्ये बीच येथील रत्नसागर हॉटेल संदर्भात हा वाद होता. हे हॉटेल शासनाने लीजची मुदत संपण्यापूर्वीच ताब्यात घेतले असे हॉटेल संचालकांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात रीट दाखल केले. हायकोर्टाने लवाद नेमला व लवादाने रिसॉर्ट संचालकांच्या बाजूने निकाल दिला. रत्नसागर हॉटेलला रुपये ९ कोटी २५ लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचे आदेश झाल्याचे रत्नसागर रिसॉर्टचे संचालक श्री. सावंत यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार दि. ४ एप्रिल २०२५ रोजी कोर्टाचे बेलिफ व रिसॉर्टचे संचालक रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले व जिल्हाधिकार्‍यांची खुर्ची, संगणक व अन्य साहित्य जप्त करण्याची पंचयादी घालण्याचे काम सुरु झाले. हे सामान भरुन नेण्यासाठी कलेक्टर ऑफीसजवळ २ टेम्पो सज्ज ठेवण्यात आले होते. हे समजताच रत्नागिरीचे प्रांताधिकारी श्री. जीवन देसाई यांनी तातडीने जिल्हा न्यायालयात कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सरकारी वकील ऍड. अनिरुध्द फणसेकर यांनी महसूल विभागाची बाजू मांडली. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने जप्तीच्या कारवाईला दि. १६ एप्रिल पर्यंत स्थगिती दिली व कारवाई थांबली. यामुळे सरकारची नामुष्की झाल्याची जोरदार चर्चा रत्नागिरी पासून मुंबई पर्यंत जनतेत जोरदारपणे सुरु झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg