दापोली (शशिकांत राऊत) : दापोलीतील एकाच घरातील सख्या भावा-बहिणींनी शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवत पीएचडी पदव्या प्राप्त केल्या आहेत. आधी बहिण सलमा मुस्तफा खान यांनी पीएचडी मिळवली आणि त्यानंतर भाऊ सुलेमान मुस्तफा खान यांनीही हीच कामगिरी करत दापोलीचा नावलौकिक वाढवला आहे. या दोघांच्या यशाने दापोलीकरांना अभिमान वाटत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दापोलीचे रहिवासी असलेले सुलेमान मुस्तफा खान यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांचा संशोधनाचा विषय होता, उन्हाळी आफ्रिकन झेंडूच्या वाढीवर, उत्पन्नावर आणि गुणवत्तेवर ह्युमिक ऍसिड आणि जिबरेलिक ऍसिडचा प्रभाव. हे संशोधन फुलशेती आणि लँडस्केप आर्किटेक्चर क्षेत्रात महत्त्वाचे ठरले आहे. डॉ. डी. एम. पंचभाई यांनी त्यांना मार्गदर्शन केले. सुलेमान यांनी या संशोधनात ह्युमिक ऍसिड आणि जिबरेलिक ऍसिड चा झेंडूच्या वाढीवर, उत्पन्नावर आणि गुणवत्तेवर होणारा प्रभाव तपासला. त्यांनी या दोन्हींची योग्य मात्रा निश्चित केली आणि उपचारांचे खर्च-लाभाचे प्रमाण ठरवले. उन्हाळ्यात झेंडूच्या पिकाला येणारी आव्हाने लक्षात घेता, हे संशोधन शेतकर्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यांनी दाखवून दिले की, योग्य रासायनिक वापराने फुलांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते. सध्या डॉ. सुलेमान खान अबू धाबी येथे एका नामांकित कंपनीत लँडस्केप इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण दापोलीतील यू. ए. दळवी हायस्कूलमध्ये, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नॅशनल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण झाले. त्यांनी कुडाळ येथील महाविद्यालयातून उद्यानविद्याची (हॉर्टिकल्चर) पदवी घेतली आणि कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. या यशाबद्दल कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कुलगुरू डॉ. संजय भावे, प्रमोद सावंत आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू व पत्रकार मुश्ताक खान यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सलमा मुस्तफा खान यांना बागायती शास्त्र (फळ विज्ञान) या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय आंबा (मॅंगिफेरा इंडिका एल.) च्या यादृच्छिक संकरित संततीमधील जैवप्रणाली अभ्यास ( BIOSYSTEMIC STUDIES IN RANDOMLY MATED HYBRID PROGENIES OF MANGO (Mangifera indica L.) हा होता. सलमा यांनी ही पदवी प्रथम श्रेणीत आणि विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या सर्व पात्रता पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ रोजी राहुरी येथे आयोजित एका विशेष समारंभात त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. या समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू पी. जी. पाटील यांनी स्वाक्षरीसह प्रमाणपत्र प्रदान केले होते. सुलेमान आणि सलमा या भाव-बहिणींच्या या यशामुळे दापोलीकरांना अभिमान वाटत आहे. त्यांच्या संशोधनाने शेती क्षेत्रात नवीन दिशा देण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या दोघांनीही आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.