loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड एसटी स्टॅड आवारातील स्वच्छता गृह वापरण्यायोग्य करा नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल ; शिवसेनेचा एस.टी. प्रशासनाला इशारा

दापोली (प्रतिनिधी) : मंडणगड एस.टी. स्टॅड आवारातील स्वच्छता गृह आणि स्वच्छता गृहाच्या बाहेरील मलमुत्राचे सांडपाणी साचून राहत असल्याने त्याची सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. प्रवांशासह शहरातील रहिवाशांना होणा-या दुर्गंधी आणि फैलावलेल्या डासांच्या त्रासाची दखल घेऊन एस.टी. प्रशासनाने वेळीच ही महत्त्वाची समस्या दुर केली नाही तर मंडणगड तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आंदोलन करून या विरोधात आवाज उठवे शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची जबाबदारी ही पुर्णपणे मंडणगड एसटी आगार प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी अशा प्रकारचा इशारा मंडणगड एस.टी.प्रशासनाला शिवसेनेना मंडणगड तालुका पदाधिका-यांनी प्रत्यक्षपणे भेटून लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एसटी डेपोच्या आवारातील स्वच्छता गृहातील अस्वच्छतेमुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतागृहात ड्रेनेज लाईनचा अभाव असल्याने स्वच्छतागृहातील टाकीतच मलमूत्र साठून राहत असल्याने बस स्टॅण्डच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे. मंडणगड एसटी आगार प्रशासन मल नि:सारण व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत आहे. मंडणगड तालुक्याचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एसटी डेपो येथे आहे. यामुळे तालुक्यातील प्रवाशांसह अन्य तालुक्यातील प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या एसटी प्रवाशांचीही ये-जा असते. स्वच्छतागृहाच्या बाहेरील दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका आहे. असे असताना देखील एसटी प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची समस्या सोडविण्यासाठी अजिबात लक्ष देत नाही.

टाईम्स स्पेशल

या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हिताच्या आणि अतिशय महत्वाच्या अशा समस्येच्या सोडवणुकीसाठी मंडणगड एस. टी. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या समस्येचे निराकरण करावे आणि येथे आलेल्या व येणार्‍या प्रवाशांसह मंडणगड शहरातील स्थानिक रहिवाशांना दुर्गंधी ऐवजी मोकळा श्वास घेता यावा यासाठी जनहित लक्षात घेऊन मंडणगड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने एस.टी. प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. वेळीच सदर प्रकारात सुधार न झाल्यास तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या माहितीची प्रत मंडणगड पोलीस ठाण्याला देण्यात आली. या महत्त्वाच्या भेटीदरम्यान मंडणगड तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख रघुनाथ पोस्टूरे, युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्लार, शिवसेना तालुका सचिव सुधीर पागार, युवासेना उपतालुका अधिकारी उमेश घागरूम, आय. टी. सेल अधिकारी प्रकाश महाडिक, दीपक बोर्ले, नितेश पवार आदी यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg