loader
Breaking News
Breaking News
Foto

धनंजय मुंडेना दणका! कोर्टाने करुणा मुंडेंच्या बाजूने दिला निकाल, पत्नी नसल्याचा दावा फेटाळला

माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली आहे. कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना पत्नी करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी देण्याचा आदेश दिला होता. धनंजय मुंडे यांनी या निर्णयाला आव्हान देत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी झाली असता, कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावत सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना 6 फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना 2 लाखांची देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला होता. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखील कोर्टानं मान्य केला होता. दुसरीकडे करुणा मुंडे यांनी आपल्याला 15 लाखांची पोटगी मिळावी अशी मागणी केली होती. "माझी दर महिना 15 लाखांची मागणी आहे. माझा 1 लाख 70 हजारांचा घराचा हफ्ता आहे. 7 ते 8 महिन्यापांसून हफ्ता भरलेला नाही. 30 हजारांचा मेंटेनन्स आहे. मुलगा घऱात बेरोजगार बसला आहे. 2 लाखात काय होणार?," अशी विचारणा करुणा मुंडे यांनी केली होती. सुनावणीच्या सुरुवातीला धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी सांगितलं की, "लग्नाचे पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं, मात्र मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र सोडून बाकी सगळी कागदपत्रं त्यांनी आणली आहेत. त्यांना काही अर्थ नाही. त्यावर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आम्ही आधीच कागदपत्रं दिली आहेत ज्यामध्ये करूणा मुंडे माझ्या पत्नी नाही हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत असं सांगितलं.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg