नाणीज (वार्ताहर) : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आज श्रीराम नवमी वारी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. सकाळी महामृत्युंजय याग सुरू झाला. त्यानंतर दुपारी वाद्यांच्या गजरात निमंत्रण मिरवणुका झाल्या. आज सकाळी महामृत्युंजय सप्तचिरंजीव याग सुरू झाला. सर्व कार्यक्रमांचे पौरोहित्य वे.शा. संपन्न भालचंद्रशास्त्री शौचेगुरुजी यांनी केले. त्यानंतर देवदेवतांना सोहळ्याची निमंत्रणे देणार्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. ढोलताशांच्या गजरात त्या निघाल्या. त्यात कलशाधारी महिला, निशाणधारी पुरुष व महिला श्रीरामाचा जयजयकार करीत सहभागी झाल्या होत्या. नाथांचे माहेर, वरदचिंतामणी, संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर येथे या मिरवणुका काढण्यात आल्या. त्याचे यजमानपद वसई जिल्हा सेवा समिती, नवी मुंबई सेवा समिती, पुणे जिल्हा सेवासमिती, नागपूर जिल्हा सेवासमितीकडे होते. या सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिरासह सुंदरगडावरील सर्वच मंदिरे सुशोभित करण्यात आली आहेत.
उद्या ६ मार्च रोजी मुख्य सोहळा आहे. ११.३० ते १ या काळात जन्मोत्सव होईल. यात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होणार आहेत. यावेळी श्रीरामाची गाणी, पाळणा म्हटला जाईल. पुष्पवृष्टी केली जाईल. प्रसाद, महाप्रसाद असेल. श्रीरामाचा जयजयकार करीत सारे आनंदोत्सव साजरा करतील. रात्री ७.३० ते ८.३० प.पू. कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर सर्वांचे आकर्षण असलेले जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर देवाला साकडे घालून वारी उत्सवाची सांगता होईल. दरम्यान काळापासून भाविक श्रीक्षेत्री दाखल झाले आहेत. आज सकाळी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटलमध्ये नामवंत डॉक्टर तपासणी व उपचार करीत आहेत. दोन दिवस २४ तास महाप्रसाद सुरू झाला त्याचा लाभ भाविक घेत आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.