loader
Breaking News
Breaking News
Foto

खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० रोजी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

मालवण (प्रतिनिधी) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे १० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता भारतीय जनता पार्टी मालवण पुरस्कृत जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेस मालवण कोळंब पूल नजीक सागरी महामार्ग नाका येथून सुरुवात होणार आहे. स्पर्धा चार गटात घेण्यात येणार आहे. पंधरा वर्षाखालील मुली व मुलगे या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रूपये, खुल्या व पुरुष गटातील विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे ९ एप्रिल पर्यंत नोंदवायची आहेत. पंधरा वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंनी येताना आधारकार्ड घेऊन येणे अनिवार्य आहे. स्पर्धे संदर्भात अधिक माहितीसाठी ताराचंद पाटकर ९९७५९८७५३०, तन्वी परब ७५८८११७८०५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg