loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा करून त्याची विक्री प्रकरणी पाच जणांना अटक , मुख्य आका फरार

ठाणे दी.५ (प्रतिनिधी): ठाणे शहरालगत असलेल्या मिरारोड पुर्व भागातील पेणकरपाडा भागातील एका हाॅटेलच्या गल्लीत बेकायदेशीरपणे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच रिकाम्या बाटल्यामध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य भरून त्याची विक्री करणाऱ्या पाचजणांना ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली असून त्यांच्याकडून ६१ लाख ४६ हजारांचा मद्यसाठा पथकाने जप्त केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार फरार असून पथके त्याचा शोध घेत आहेत. अशी माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हा अधीक्षक प्रवीण तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भारतीय बनावटीचे विदेशी मद्य प्रकरणी आरोपी रामकेश सिताराम गुप्ता, राहुल ज्ञानेश्वर काटे, गणेश प्रकाश बांद्रे, पप्पु देवनाथ गुप्ता, नितेश बाळाराम म्हात्रे यां पाचजणांना अटक करण्यात आली आहेत. तर, या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार राकेश बाळाराम म्हात्रे हा फरार झाला आहे. त्याचा राज्य उत्पादन शुक्ल विभागाची पथके शोध घेततसेच या टोळीने रिकाम्या बाटल्यांमध्ये भरण्यासाठी भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणले कुठून याचाही तपास पथके करीत आहेत..

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

१ एप्रिल रोजी. गुप्त माहितीच्या आधारे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रविण तांबे यांच्या पथकाने या भागात धाड टाकून रामकेश सिताराम गुप्ता याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडील १ लाख २५ हजार ४७० रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. पथकाने त्याची कसून चौकशी केली असता, त्याने मद्य साठा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मधून पुरविणाऱ्या व्यक्तीची माहिती दिली. एक व्यक्ती आठवड्यातून एक वेळेस मद्य पुरवठा करतो आणि तो ४ एप्रिल रोजी पुन्हा मद्य साठा पुरविण्यासाठी येणार आहे, अशी माहिती रामकेश याने चौकशीदरम्यान दिली. त्याआधारे पथकाने मिरारोड पुर्व भागात सापळा रचला होता. त्यावेळेस एका टेम्पोमधील दोन जण रामकेश याला मद्यसाठा देत असतानाच, पथकाने मद्यसाठा पुरविणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.त्यावेळी कल्याण-भिवंडी रोडवरील जांभूळवाडी येथे राहणारे मालक राकेश बाळाराम म्हात्रे यांनी त्यांच्या राहत्या घरातून हा साठा दिल्याची माहिती दोघांनी चौकशीत दिली. यानंतर पथकाने त्याठिकाणी धाड टाकली असता, तिथे नितेश बाळाराम म्हात्रे हे वाहनामध्ये भारतीय बनावटीच्या मद्याचा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये साठा ठेवताना आढळून आले. त्याला पथकाने ताब्यात घेतले असता, त्याने घराच्या पाठीमागे असलेल्या खोलीत रिकाम्या बाटल्यामध्ये भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा भरून त्या बाटल्यांचे बूच यंत्राच्या साहाय्याने लावतो, अशी माहिती पथकाला दिली. पथकाने येथे छापा टाकून ६१ लाख ४६ हजार ५५० रुपये किंमतीचा भारतीय बनावटीच्या मद्याचा साठा जप्त केला आहे, या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हा अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक डी आर दळवी, राज्य उत्पादन शुल्क बी १ विभाग ठाणे हे करीत आहेत

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

६१ लाख ४६ हजारांचा मद्य साठा जप्त

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg