दापोली ( शशिकांत राऊत ) --: श्रीराम मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम मंडळ मुर्डी कोंड (आडवी आळी ) ने आयोजित केलेल्या भव्य जिल्हा स्तरिय कबड्डी स्पर्धेत चिपळूण कोळकेवाडीने आपल्या प्रतिस्पर्धी केळशीच्या गजानन संघर्ष कबड्डी संघावर मात करत अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत प्रो कबड्डीतील शुभम शिंदे, अजिंक्य पवार आणि आदित्य शिंदे यांच्या दर्जेदार खेळाची मौज उपस्थित क्रिडा रसिकांना पाहावयास मिळाली हे स्पर्धा आयोजकांच्या स्पर्धेचे खरे यश म्हणावे लागेल.
दापोली तालुक्यातील मुर्डी कोंड ( आडवी आळी) येथील श्रीराम मंदिराला 25 वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री राम मंडळ मुर्डी कोंड ( आडवी आळी ) मंडळाने श्रीराम जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमानिमित्त 3 एप्रिल पासूनच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध प्रकारचे कार्यक्रम आनंदी वातावरणात मोठ्या उत्साहाने धुमधडाक्यात सुरू केले आहेत त्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या आणि सर्वांत लक्षवेधी ठरलेल्या जिल्हा स्तरिय कबड्डी स्पर्धेने या उत्सव सोहळ्याची रंगत चांगलीच वाढवली. एका छोटेखानी वाडीने आपल्या एकी आणि ऐक्याच्या जोरावर जिल्हा स्तरिय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून दर्दी क्रिडा प्रेमी आणि क्रिडा रसिकांची उस्फुर्त गर्दी जमवून खेळाडूंना चांगलेच प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत गजानन संघर्ष , (केळशी ) महालक्ष्मी ,( कुंभार्ली) , काळकाई ,(भरणे खेड) , खेमराज ( हर्णे ) , गुरुकुल ( चिपळूण ) , अमरभारत ( टाळसुरे ) , संघर्ष ( चिपळूण) , हिंदवी ( देवरुख ) , श्री. सिमामाता ( सालदुरे ) आणि वाघजाई ( कोळकेवाडी चिपळूण ) आदि रत्नागिरी जिल्हयातील दिग्गज एकापेक्षा एक अशा नावाजलेल्या 10 संघांनी या स्पर्धेत सहभागी होत आपल्या उत्तम आणि सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत क्रिडा रसिकांची मने जिंकली अशा या स्पर्धेत अखेर चिपळूण येथील कोळकेवाडीच्या वाघजाई कबड्डी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी केळशीच्या गजानन संघर्ष कबड्डी संघावर मात करत स्पर्धेतील अंतिम विजेत्या पदावर विजयाची मोहोर उमटवली त्यामुळे केळशीच्या गजानन संघर्ष संघाला उपविजेता पदावरच समाधान मानावे लागले तर तृतीय क्रमांक टाळसूरेच्या अमरभारत तसेच चतुर्थ क्रमांक चिपळूणच्या गुरुकुल या संघाना जाहीर करण्यात आला.
टाइम्स स्पेशल
अंतिम विजेत्या चिपळूण कोळकेवाडीच्या वाघजाई संघाला रोख रक्कम 33025 रुपये आणि मानाचा आकर्षक चषक तसेच व्दितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या केळशीच्या गजानन संघर्ष कबड्डी संघाला रोख रक्कम 22025 रुपये आणि आकर्षक चषक देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिगवण आणि वैभव धाडवे यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले. यावेळी महिला मंडळ अध्यक्षा अश्विनी चौधरी , सरपंच मिताली तांबट, पोलीस पाटील प्रमोद राऊत, आंजर्ले सरपंच मेघना पवार, आंजर्ले पोलीस पाटील जगदीश कलमकर, तंटामुक्त अध्यक्ष किरण सांबरे, संदेश देवकर, नितीन दरिपकर , मकरंद म्हादलेकर, रविंद्र धाडवे, चंद्रकांत धाडवे, रविंद्र तोडणकर, नितीन बांद्रे, शशिकांत पेंडसे, सुनील तांबट, प्रकाश साळवी, दिनेश राऊत, मुकेश राळे, प्रशांत रहाटवळ, अभिजीत सरनोबत, दिपक महाडिक, उदय बापट, भालचंद्र केळसकर , संदेश झगडे आदी मान्यवरांसह मुर्डी कोंड आडवी आळी श्रीराम मंडळ स्थानिक ग्रामस्थ, मुंबई मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच महिला मंडळ उपस्थित होते. या स्पर्धेतील सर्वोतकृष्ट खेळाडू म्हणून वाघजाई कोळकेवाडीच्या निरज पालांडे या खेळाडूला तर उत्कृष्ट पक्कडीचे पारितोषिक आदित्य गजमल तसेच उत्कृष्ट चढाई चा किताब गजानन संघर्ष च्या अविष्कार साळवी याला देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या स्पर्धेचे आपल्या ओघवत्या शैलीतील खुमासदार समालोचन दत्तात्रय क्षिरसागर आणि उत्कर्ष कर्देकर यांनी उत्तम केले त्यामुळे आणखीनच स्पर्धेची रंगत वाढली. स्पर्धेचे पंच प्रमुख वैभव बोरकर यांनी काम पाहिले तर क्रिडांगणावर संदेश झगडे, अक्षय सुर्वे आणि समित घाणेकर यांनी पंचाची उत्तम भुमिका पार पाडली.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.