loader
Breaking News
Breaking News
Foto

लवेलनजीक ट्रकमध्येच चालकाचा मृत्यू

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लवेल येथील राजस्थानी ढाब्याच्या बाजूला असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेत. ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. संदीप शंकर जाधव (४५, रा. दरे-सातारा) असे मृत चालकाचे नाव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यातील फिर्यादी व ट्रकचालक दोघेही औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील माल कर्नाटक राज्यात वाहतूक . करतात. २ एप्रिल रोजी दोघेही युनिलिव्हर कंपनीत माल भरण्यासाठी आले होते. ट्रक भरण्यासाठी नंबर नसल्याने ते लोटे येथे ट्रकसह मुक्कामी राहिले. ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास जेवण आटपून ट्रकचालक ट्रक केबिनमध्ये झोपण्यासाठी गेला होता. दुसऱ्या दिवशीही त्याने काहीही प्रतिसाद न दिल्याने एका रुग्णवाहिकेतून परशुराम रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता मृत घोषित केले. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg