खेड : -बेजबाबदारपणे ट्रेलर चालवून चौघांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या आरोपीची माणगाव येथील जिल्हा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. मौजे वीर रेल्वेस्टेशन जवळ मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६ वर दि.०३/०१/२०२५ रोजी ००.३० वाजता हा अपघात घडलेला असून तो दि.०३/०१/२०२५ रोजी ०५.५६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर हकीकत अशी की, यांतील आरोपी सुयोग सहस्त्रबुद्धे याने मद्यप्राशन करून नशेमध्ये वाहन चालविल्यास एखाद्या व्यक्तिस गंभीर दुखापत होवू शकते किंवा मृत्यू येवू शकतो याची त्यास जाणीव असताना सुध्दा त्याने जाणीवपूर्वक मद्यप्राशन करून त्याने त्याचे ताब्यातील टोइंग टाटा ७०९ गाडी नं.एम.एच.१४/सि.एम. ३०९ ही गोवा-मुंबई हायवे रोडने महाड बाजुकडून मुंबई बाजुकडे स्वतः चालवीत घेवून जात असताना त्याने त्याचे ताब्यातील वाहन बेदरकारपणे व अतिवेगाने चालवून वीर रेल्वे स्टेशनजवळ आल्यावेळी रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन अविचाराने, हयगयीने व अतिवेगाने चालवून रोडचे बाजूला डिझेल संपल्याने लोणेरे बाजूकडे तोंड करून उभी असलेली स्कॉर्पीओ कार नं.एम.एच.०६/बि.ई.४०४१ हिला व कारचे अवतीभोवती उभे असलेले साक्षीदार तसेच कारचे मागे उभे असलेले साक्षीदार यांना 'पाठीमागून जोराने ठोकर मारून आरोपी याने सदोष मनुष्यवध व सदोष मनुष्यवधाचा प्रयल करून १) सुर्यकांत सखाराम मोरे, २) प्रसाद रघुनाथ नातेकर, ३) साहिल ऊर्फ रूतीक नथुराम शेलार व ४) समिप ऊर्फ समिर सुधीर मिडे यांचे मरणास व १) शुभम राजेंद्र माटल व २) सुरज अशोक नलावडे यांचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला म्हणून आरोपी-सुयोग सुभाष सहस्रवबुध्दे याचेविरुध्द कलम १०५, ११०, २८१, १२५(अ), १२५ (ब) भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम १८४, १८५ मोटार वाहन अधिनीयम १९८८ प्रमाणे गुन्हा केला आहे असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला.
आरोपी सुयोग सहस्रबुध्दे यांच्यावतीने वकील सुधीर बुटाला व समीर शेठ यांनी जामीनासाठी माणगाव जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देऊन जामीन देऊ नये, तसेच अशा प्रकारचा पुन्हा अर्ज आरोपीला करता येणार नाही, अशा प्रकारचा देखील वरिष्ठ न्यायालयाचा निकाल सादर करण्यात आला होता. याकामी आरोपीतर्फे ॲड. समीर शरद शेठ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून माणगाव येथील जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र आरोपीला गुन्ह्याचे स्वरूप पाहून पन्नास हजार रुपयांचा जामीन देण्याचा आदेश देण्यात आला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.