खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील काडवली-गजवाडी येथून १० लाख रुपये किंमतीचे जेसीबी साहित्य चोरल्याप्रकरणी येथील पोलिसांनी नांदेड येथे गजाआड केलेल्या देवराव बाबुराव धोत्रे (३९ रा. शिवाजीनगर-नांदेड), सुरेश रामू दांडेकर (बसर्ली-नांदेड) यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर चिरणी-धनगरवाडी येथील जंगलमय भागात लपवून ठेवलेले हे सर्व साहित्य येथील पोलिसांनी हस्तगत केले.
प्रल्हाद प्रकाश लाड यांनी काडवली-गजवाडीत नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदाई कामासाठी नवीन जेसीबी मशीन आणले होते. यामध्ये ३ टन वजनाच्या मशिनसह इतर सुटे भाग चोरट्यांनी लंपास केले होते. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अटकेतील एक संशयित देवराव धोत्रे हा प्रल्हाद लाड यांच्याकडे कामाला होता. तर दुसरा संशयित नांदेड येथून येथे आला होता. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला होता.
येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती देत पोलिसांचे एक पथक नांदेड येथे पाठवले होते. याचा दोन्ही संशयितांना सुगावा लागताच दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते. पथकाने दोघांच्याही नांदेड बसस्थानकात मुसक्या आवळल्या. दोन्ही संशयितांनी चोरलेले जेसीबीचे साहित्य चिरणी-धनगरवाडीतील जंगलमय भागात लपवून ठेवल्याची कबुली दिल्यानंतर पथक घटनास्थळी पोहचून १० लाख रू. किंमतीचे सर्व साहित्य हस्तगत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस कॉन्स्टेबल शिरीष साळुंखे यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली. या दोन्ही संशयितांच्या अटकेने अन्य चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.