loader
Breaking News
Breaking News
Foto

नारळपाण्याने घेतला जीव! बुरशीजन्य संसर्गामुळे मेंदूला नुकसान; 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

उन्हाळ्यात नारळपाणी (Coconut Water) हे आरोग्यदायी आणि थंडगार पेय मानले जाते. लोकांना ते विशेषतः समुद्रकिनारे प्यायला खूप आवडते. पण जर या नारळ पाण्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे नारळ पाणी प्यायल्यानंतर एका व्यक्तीचा मेंदूला इजा झाल्याने मृत्यू झाला. एका 69 वर्षीय डॅनिश व्यक्तीने शिळे आणि खराब झालेले नारळ पाणी प्यायले, त्यानंतर काही तासांतच त्याची तब्येत बिघडू लागली. केवळ 26 तासांतच त्याचा मृत्यू झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रिपोर्ट्सनुसार, या माणसाने एक महिना शिळे नारळ पाणी प्यायले होते, जे रेफ्रिजरेटरमध्ये साठवले नव्हते. त्याला नारळाची चव विचित्र वाटली म्हणून त्याने ते जास्त प्यायले नाही, परंतु थोड्या प्रमाणात प्यायल्याने त्याच्या शरीरात घातक बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) झाला. यानंतर, त्याला घाम येऊ लागला, उलट्या होऊ लागल्या, त्याचा तोल गेला आणि तो कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर, डॉक्टरांना आढळले की, त्याच्या मेंदूला गंभीर सूज आली आहे. 26 तासांनंतर त्याला मेंदू मृत घोषित करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

नारळपाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. झाडावरुन शहाळे खाली पडतात तेव्हा त्याला भेगा ही पडत असतात. शहाळ्याची विक्री जर वेळीच झाली नाही तर बुरशी पकडण्याचा धोका असतो आणि अशी बुरशी आरोग्याला धोकादायक असते. त्यामुळे नारळपाणी पिताना देखील ते शहाळे किती दिवसाचे आहे? हे पहायला हवे. साधारणपणे ताजे शहाळे कोकणात विकले जातात पण बाहेर मात्र कोकणातून आणलेले शहाळे अनेक दिवस ठेवले जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg