loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवम बबन घोगळे (वेंगुर्ला), द्वितीय क्रमांक वैभव स्नेहा सूर्यकांत नार्वेकर (सुकळवाड मालवण) तर तृतीय क्रमांक महेंद्र धाकू वरक (कुडाळ) यांनी पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी युवराज लखमराजे, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सह्याद्री फाऊंडेशनचे सुनील राऊळ, भाजप मंडळ अध्यक्ष महेश धुरी, भाजपचे मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर अडीवडेकर, बाबुराव कविटकर, शैलेश नाईक, दिलीप भालेकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब, सुनील खानोलकर, गजानन बांदेकर शशिकांत मोरजकर, मधु देसाई, प्रसाद अरविंदेकर, मिसबा शेख, दीपक राऊळ, तारकेश सावंत, गुरु मठकर, डॉ. तेंडुलकर आदी उपस्थित होते. सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर भाजप आयोजित खासदार नारायण राणे वाढदिवसाच्या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा बक्षीस वितरण लवकरच करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg