loader
Breaking News
Breaking News
Foto

एम. सी. एफ तर्फे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन, बोरिवलीच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहयोगाने दि. 18 ते 20 एप्रिल 2025 दरम्यान मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन, प्रेमनगर बोरिवली (पूर्व), मुंबई येथे 10 व्या एम. सी. एफ. राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना 1 लाख 10 हजारांची रोख बक्षिसे व चषक आयोजकांच्यावतीने देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज संलग्न जिल्ह्यांमार्फत दि. ८ एप्रिल २०२५ पर्यंत स्वीकारण्यात येणार असून प्रवेश अर्ज www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. खेळाडूनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र कॅरम असोसिएशन मानद सचिव अरुण केदार यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg