loader
Breaking News
Breaking News
Foto

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त जिल्हास्तरीय प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन ---

मालवण(प्रतिनिधी)- भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवण च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त संस्था, कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि २००६ बारावी बॅच पुरस्कृत भव्य जिल्हास्तरीय प्रो- कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २२ वर्षाखालील मुले व मुली अशा दोन गटातील ही स्पर्धा रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे. या स्पर्धेतील मुला मुलींच्या दोन्ही गटातील प्रथम चार क्रमांकाच्या संघाना अनुक्रमे रु. ५०००, रु. ३०००, रु. २०००, रु. १००० तसेच आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, अष्टपैलू खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील बक्षिसे सौ. अन्वेषा आचरेकर व चषक श्री. सौगंधराज बादेकर, सागर जाधव यांनी पुरस्कृत केले आहेत. इच्छुक संघांनी दि. १० एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ललित चव्हाण - ९०९६७२८०४८, सौगंधराज बादेकर - ९४२००२२८९० ओंकार यादव - ८९७५७४६९२९, हिना धुरी- ७०४५२५६४२२, कॉलेज- ९४०५९१५२९८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg