loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवलीत राम नवमीनिमित्त रामरंगी रंगले रामभक्त; राम जन्मोत्सव सोहळ्याला रामभक्तांची मंदिरात गर्दी ---

कणकवली(प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी राम नवमी उत्सव भक्तीमय वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यामुळे सर्वत्र राममय वातावरण होते. ठिकठिकाणी पार पडलेला राम जन्मोत्सव सोहळा रामभक्तांनी ’याची डोळा, याची देही’ पाहता अनुभवला. तालुक्यात राम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शहरासह तालुक्यातील हळवल, पिसेकामते, वरवडे,कलमठ, यासह अन्य गावांमध्ये राम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. राम नवमीनिमित्त शहरातील श्री देव काशिविश्वश्वेर मंदिरात गेले काही दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. रविवारी सकाळी श्रींची पूजा, अभिषेक हे विधी पार पडले. त्यानंतर श्री राम जन्मोत्सवावर कीर्तन पार पडले. दुपारच्या सत्रात श्री राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. राम जन्मला सखे...राम जन्मला... यासह अन्य अशी पाळणे गिते म्हटली गेली. रविवार असल्याने जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. यानंतर आरती, मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा आदी कार्यक्रम पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी श्री देव काशिविश्वश्वेर मंदिर देवस्थान समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावपुरुष, मानकरी, यांच्यासह भक्तगण उपस्थित होते. जन्मोत्सव सोहळ्यानंतर भजनी कलाकरांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. सायंकाळच्या सत्रात लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तृत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा महापौराणिक प्रयोग सादर झाला. हा प्रयोग पाहण्यासाठी नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील श्री देव काशिविश्वेश्वर मंदिर, प. पू. चित्स्वरुप फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमासह तालुक्यात ठिकठिकाणी राम नवमी उत्सव मोठ्या उत्सहात साजारा करण्यात आला. महाप्रसादाचा लाभ देखील भक्तांनी घेतला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg