केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)- न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे करिअर गाईडन्स सेमिनार नुकताच संपन्न झाला. या सेमिनारला लांजा तालुक्यातील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सेमिनारमध्ये उपस्थितांना तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या भविष्याला उज्ज्वल करण्यासाठी उपलब्ध असणार्या संधीबाबत माहिती मिळावी या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या १९९०-९१ बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी करिअर गाईडन्स सेमिनारचे आयोजन करून उपक्रम राबविला. सदर सेमिनारमध्ये मुंबई स्थित तज्ञ मार्गदर्शक सौ. सुरेखा भोसले आणि श्री.हनुमंत भोसले यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य करिअर कसे निवडावे, विविध क्षेत्रातील संधीची माहिती, भविष्यातील कौशल्यांचे महत्त्व, आधुनिक काळातील कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल माहिती व्हावी यासाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या सेमिनारसाठी तालुक्यातील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आणि पालक उपस्थित होते. सदर सेमिनार कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी १९९०-९१ बॅच मधील अतुल पत्की, अनिल कांबळे, संतोष बेर्डे, अमृता पत्की, शलाका कपडी, रंजना कोळवणकर, किरण खानविलकर, भूपेंद्र जैन, संतोष शेट्ये, अभय पाध्ये, नितीन गावकर, विद्या ढेकणे, संजीवनी भाई शेट्ये, सुवर्णा कदम, रेखा लिंगायत, उत्तम गादिकर, विनायक राणे, सुनील गोसावी, प्रकाश तुळसणकर, संदीप डाफळे आणि स्वानंद शेट्ये यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच याकरिता या बॅच मधील रत्नागिरी, मुंबई व पुणे येथे असणार्या इतर माजी विद्यार्थ्यांचे देखील बहुमूल्य सहकार्य लाभले. दरम्यान, या करिअर मार्गदर्शन सेमिनारप्रसंगी न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे अध्यक्ष जयवंत भाऊ शेट्ये, माजी मुख्याध्यापक विजय बेर्डे, प्रशालेचे मुख्याध्यापक सुनिल पाटोळे तसेच शिक्षक वसंत आजगावकर, हनुमंत सरवळे आदींसह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.