लांजा - (वार्ताहर) - तालुक्यातील मठ येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथांचा १०९ वा चैत्रोत्सव सोमवार दि. ७ एप्रिल ते शनिवार दि. १२ एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे. नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा तेरावा उत्सव असून या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा डोंबिवली येथील मंदार हळबे आणि कुटुंबीय करणार आहेत. चैत्र शुद्ध दशमी शनिवार दि. ७ एप्रिल पासून चैत्र पौर्णिमा म्हणजेच शनिवार दि. १२ एप्रिलपर्यंत धार्मिक, पारंपरिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा वार्षिक चैत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दररोज पूजा, अभिषेक, लघुरुद्र, कीर्तन, गायन, नामजप आणि यागादी या कार्यक्रमांचा समावेश आहे.
शनिवारी दि. ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता श्रींची चतुःषष्टी राजोपचार पूजा होईल. रात्री ९ ते १०.३० या वेळेत डोंबिवली येथील संजय भागवत यांचे संवादिनीवादन होणार आहे. रात्री १०.३० वाजता स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत मंगळवार दि. ८ एप्रिल ते शनिवार दि. १२ एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी ८ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प आणि महाप्रसाद होईल. याच वेळेत मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी गणेशयाग, बुधवार दि. ९ एप्रिल रोजी विष्णुयाग, गुरुवार दि. १० एप्रिल रोजी दत्तयाग, शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी नवचंडी तर शनिवार दि. १२ एप्रिल रोजी सौरयाग होणार आहे. मंगळवार दि. ८ एप्रिल ते शुक्रवार दि. ११ एप्रिल या कालावधीत दररोज रात्री ९ ते १२ या वेळेत नृसिंहवाडी येथील ह.भ.प. शरदबुवा घाग यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी दि. १३ एप्रिलला पहाटे ४ वाजता ह.भ.प. शरदबुवा घाग यांचे लळिताचे कीर्तन होईल. याशिवाय दररोज सायंकाळी ७.३० वाजल्यानंतर आरत्या आणि नामजप, रात्री १२ वाजल्यानंतर भोवत्या आणि छबिन्याचा कार्यक्रम होईल. मंगळवार दि. ८ एप्रिलला सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत मंत्रजागर केला जाणार आहे. शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महालक्ष्मी कुंकुमार्चन आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. शनिवार दि. १२ एप्रिललाच रात्री ९.३० ते १२ या वेळेत देविका टिकेकर आणि तन्मय टिकेकर यांचा भजनसंध्या हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, या उत्सवकाळात याग करण्यासंदर्भात अभय देवस्थळी (९४२११८८१३९) आणि दीपक भाट्ये (९४२३८७५४५३) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच श्रींची पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम यांच्या अधिक माहितीसाठी श्रेयस मुळ्ये (९४०५९१७५६७), (९०२८७४५०३८), उमेश आंबर्डेकर (९४२३२९२४३७) यांच्याशी संपर्क साधावा. तरी या वार्षिक चैत्रोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचे अध्यक्ष मंदार हळबे, उपाध्यक्ष श्रीनिवास गुण्ये, चिटणीस नंदकुमार नेवाळकर आणि खजिनदार श्रेयस मुळ्ये यांनी केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.