loader
Breaking News
Breaking News
Foto

हेवाळे मुळस येथील शेकडो भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा ---

दोडामार्ग(प्रतिनिधी)- हेवाळे मुळस येथील श्री राम पंचायतन देवस्थान या ठिकाणी रविवारी रामनवमी निमित्ताने श्री राम जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यांनी साजरा करण्यात आला. यावेळी पाळणा गीत, आरती तसेच विविध कार्यक्रम पार पडले. राञी नाटय प्रयोग इतर कार्यक्रम पार पडले. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावातील भक्तांनी यावेळी दर्शन, तीर्थ प्रसाद, महाप्रसादाचा लाभ घेतला. दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी, दोडामार्ग, कोनाळ, तसेच इतर ठिकाणी देखील राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविकांनी, महिलांनी गर्दी केली होती. मुळस हेवाळे येथील श्री राम पंचायतन देवस्थान आख्यायिका मोठी आहे, नवसाला पावणारा देव अशी ओळख आहे. दोडामार्ग ते बेळगाव , कोल्हापूर, मुख्य मार्गावर रामघाट ब्रिटिश काळातील रस्ता समोर हे मंदिर आहे. हेवाळे मुळस गावातील ग्रामस्थ भक्तगण यांच्या वतीने मंदिरात विविध सुधारणा घडवून आणल्या जात आहेत. हजारो भाविकांचे श्रध्दास्थान अशी हेवाळे मुळस येथील श्री राम मंदिर पंचायतन देवस्थान ओळख आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg