loader
Breaking News
Breaking News
Foto

अंन्जुमन-ए-तालीम शिक्षण संस्थेच्या विश्वस्ताची निवडणूक बिनविरोध ---

खेड - खेड शहरातील प्रतिष्ठीत अंन्जुमन-ए-तालीम, शिक्षण संस्थेच्या २०१९ साली निवडूण आलेल्या विश्वस्त मंडळाची मुदत संपल्यामुळे पुढील पाच वर्षासाठी संस्थने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला होता त्याप्रमाणे संस्थेच्या विश्वस्त मंडळावरती एकूण १५ सदस्याची निवड करावयाची होती त्याप्रमाणे फक्त १४ च उमेदवारी अर्ज आल्यामुळे रविवार दिनांक ०६/०४/२०२५ रोजी झालेल्या आमसभे मध्ये निवडणूक संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळावरती एकूण १५ सदस्य निवडावयाची असल्याचे सांगितले त्याप्रमाणे फक्त १४ उमेदवाराचेच अर्ज आल्यामुळे १४ सदस्याची संस्थेच्या विश्वस्त मंडळावरती बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले १४ बिनविरोध निवडून आलेले सदस्याची संस्थेच्या विश्वस्त मंडळावर पुढील प्रमाणे निवड करण्यांत आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री शमशुद्दीन अहमद मुकादम, अध्यक्ष, श्री गौस महमंद इस्हाक खतीब, चेअरमन, श्री यासीन अहमद खतीब, उपाध्यक्ष, श्री हनीफ अलीसाहेब घनसार, सचिव, श्री जावेद अ. गफूर कौचाली, उपसचिव, श्री मुख्तार मोहमंद मुकादम खजिनदार व अंन्जुमन ए तालीम, उर्दू प्राथमिक शाळा शालेय समिती, श्री रियाज इब्राहिम देसाई अंतर्गत लेखा परीक्षक, श्री हमीद मोहमंद मुकादम मुख्यकार्यकारी अधिकारी, श्री अहमद अ करीम मुकादम, सदस्य. श्री नजीर अ. करीम मुकादम, सदस्य, श्री मुसा बाबूलाल नालबंद, सदस्य, श्री जाकीर हुसैन हसनमियॉं मुसा, सदस्य, श्री वहिद अहमद मुकादम सदस्य व मुकादम हायस्कूल इंग्लिश मिडीअम स्कूल शालेय समिती चेअरमन, श्री माजीद म. इस्हाक खतीब सदस्य. उपस्थित सर्व सभासदांचे व बिनविरोध निवडून आलेल्या नवीन विश्वस्तांचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री दत्ताराम भिकू धुमक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकरी श्री इब्राहिम अहमद देशमुख यांनी अभिनंदन केले. आमसभेला उपस्थित असलेल्या सर्व सभासदांनी नवीन बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारणीस मंजूरी देवून संस्था विद्यमान अध्यक्ष श्री शमशुद्दीन अहमद मुकादम योच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहिर केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg