loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री रामवरदायिनी देवीची यात्रा १२ एप्रिल रोजी ---

खेड- खेड तालुक्यातील चोरवणे गावातील श्री रामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी होत आहे. ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे. देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावाने, श्रध्देने साजरे केले जातात. देवीचे मंदिर हेमाडपंती असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे. अशा या जागृत देवीची यात्रा शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात सुरू होत आहे. सायंकाळी ६ वाजता लाट चढविण्यात येते. ७ वाजता देवीची आरती झाल्यानंतर रात्री ९ वाजता परिसरातील देवदेवतांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. देवी-देवता बरोबर आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि मनोगत रात्री १० वाजता, रात्री ११ वाजता ढोल-ताशांच्या गजरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचवत छबिना काढला जातो व रात्री १२ वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवला आहे. हा परंपरागत देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार मित्र मंडळी आप्तेष्टांसह उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ, श्री रामवरदायिनी देवस्थान कमिटी आणि सभासद व ग्रामविकास मंडळ चोरवणे, मुंबई-पुणे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg