loader
Breaking News
Breaking News
Foto

जैन मुनी शांतीसागर महाराजांना तुरुंगवासाची शिक्षा

बलात्कार प्रकरणी दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुरत सत्र न्यायालयानं सुनावली आहे. 19 वर्षी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ह शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांनी 2017 मध्ये, एका 19 वर्षांच्या श्राविका (महिला जैन भक्त) हिच्यावर बलात्कार केला होता. शुक्रवारी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांनी 2017 मध्ये, एका 19 वर्षांच्या श्राविका (महिला जैन भक्त) हिच्यावर बलात्कार केला होता. शुक्रवारी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. आज त्यांची शिक्षा जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये शांतीसागर यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 मध्ये, जैन मुनी सुरतमधील नानपूर येथील उपाश्रयात राहत होते. म्हणूनच मूळ मध्य प्रदेशातील 19 वर्षांची मुलगी आणि तिचे कुटुंब, जे त्यांना आपले गुरु मानत होते, त्यांची शांतीसागरवर खूप श्रद्धा होती. शांतीसागर यांनी त्यांना पूजाविधीच्या बहाण्याने सुरत आश्रमात बोलावले होते. रात्री कुटुंब आश्रयस्थानात राहिले. यावेळी, रात्री 9.30 च्या सुमारास, शांतीसागर यांनी मुलीला पूजेचे निमित्त करून त्यांच्या खोलीत बोलावले आणि कुटुंबातील सदस्यांना खोलीबाहेर उभे राहण्यास सांगितले. यावेळी, पूजेचे बहाण्याने धमकी देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

रुवातीला कुटुंबाने आपला सामाजिक आदर गमावू नये म्हणून गप्प बसले, परंतु नंतर, इतर मुलींसोबत असे घडू नये असे वाटून, कुटुंबाने घटनेच्या 13 दिवसांनी सुरतमधील अथवलाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून जैन मुनी शांतीसागर यांना अटक केली.महाराज्यांनी सर्व झ्झ्रोप फेटाळून मौन धारण केले .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg