loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर रामपेठ येथील श्री प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

मकरंद सुर्वे (संगमेश्वर) : संगमेश्वर रामपेठ येथील श्री प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्साहावेळी सकाळी श्रीराम लक्ष्मण सीता यांच्यावर दुग्ध अभिषेक करण्यात आला तसेच पुष्पहार घालून आरती करण्यात आली. फुलांच्या व मोत्यांच्या साहाय्याने बनवलेल्या सुंदर अशा पाळण्यामध्ये श्रीरामांच्या बालमूर्ती महिलांनी पाळण्यात घालून पाळणा गीत म्हणण्यात आले. त्यावेळी सर्व भक्तांनी फुलं उधळत प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा केला. तसेच फटाक्यांच्या आतंकषबाजीत व ढोल ताशांच्या गजरात श्रीरामांचा गजर करत भक्तांनी घोषणा दिल्या तसेच देवरुखचे मुळे यांनी कीर्तन म्हणत सुमारे ५०० भक्तांनी श्रीरामांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी श्रीराम मंडळाच्या भक्तांनी श्री रामांचे रामपेठ ते बाजारपेठ स्टॅन्डपर्यंत पालखी ढोल ताशांच्या गजरात संगमेश्वर बाजारपेठेतील भक्तांना दर्शन मोठ्या उत्साहात पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg