loader
Breaking News
Breaking News
Foto

'उत्तम आरोग्य हा प्रत्येक समृद्ध समाजाचा पाया आहे'; आजच्या जागतिक आरोग्य दिनी पंतप्रधान मोदी यांचे जीवन शैलीत बदल करण्याचे आवाहन

दरवर्षी 7 एप्रिल रोजी जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त निरोगी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे आणि आरोग्य हेच ‘अंतिम भाग्य आणि संपत्ती’ असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त निरोगी आणि समृद्ध जग निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या दिवसाचे स्मरण करून त्यांनी देशवासीयांना निरोगी समाजासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांचे सरकार आरोग्य सेवांना प्राधान्य देत राहील आणि लोकांच्या कल्याणासाठी आवश्यक गुंतवणूक करत राहील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी लिहिले की, ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त, आपण निरोगी जग निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. आपले सरकार आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करत राहील आणि लोकांच्या कल्याणाच्या विविध पैलूंमध्ये गुंतवणूक करेल. चांगले आरोग्य हा प्रत्येक समृद्ध समाजाचा पाया आहे!’ या संदेशासोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला, ज्यात त्यांनी नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवहन केले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

या व्हिडिओमध्ये मोदींनी व्यायाम, संतुलित आहार आणि योग यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवरही चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, जर आपण आज आपल्या सवयी बदलल्या नाहीत, तर पुढील काही दशकांत ही समस्या आणखी गंभीर होईल. ते म्हणाले, अलिकडेच लठ्ठपणाच्या समस्येवर एक अहवाल आला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की 2025 पर्यंत 44 कोटींहून अधिक भारतीय लठ्ठ असतील. हा आकडा भयावह आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात पुन्हा सांगितले की, आपण आतापासून अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. तेलाचा वापर कमी करणे यासारख्या निरोगी खाण्याच्या सवयी अंगीकारणे हा केवळ वैयक्तिक निर्णय नाही तर सामाजिक जबाबदारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg