loader
Breaking News
Breaking News
Foto

निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत पटवर्धन हायस्कूलमध्ये चावडी वाचन उपक्रम

भारत शिक्षण मंडळ संचलित रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये पाच एप्रिल रोजी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत चावडी वाचनाचा उपक्रम घेण्यात आला. सध्या ५ मार्च ते ३० जूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये भाषा आणि गणितविषयक क्षमता निश्चित करून दिलेल्या आहेत. ३० जूनपर्यंत राज्यातील सर्व शाळातील १००% विद्यार्थ्यांमध्ये या १००% क्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वच शाळांच्यामध्ये कृती कार्यक्रमांच्यावर भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता पडताळण्यासाठी चावडी वाचनाचा उपक्रम सध्या राबविला जात आहे. पटवर्धन हायस्कूलमध्येही इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चावडी वाचनाचा उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये प्रशालेच्या पालक शिक्षक संघातील प्रतिनिधी तसेच पाचवी ते बारावी पर्यंतच्या पालक प्रतिनिधींनी सुद्धा सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अध्ययन क्षमता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना पालक प्रतिनिधींनी वाचन लेखन तसेच गणित विषयक क्षमता यावर आधारित विविध प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. यामध्ये सर्वच विद्यार्थी ७५ टक्क्‌यांपेक्षाही जास्त क्षमता प्राप्त करणारे आहेत असा अभिप्रायही पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधींनी दिला. वाचन, लेखन तसेच गणितीय क्रिया करताना विद्यार्थी रंगून गेले होते. विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थी उत्स्फूर्तपणे उत्तरे देत होते. या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रदीप सुर्वे प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उप मुख्याध्यापक रुपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, कल्पना शिरोळकर तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य प्रमोद चौगुले, सुनील किर यांच्यासह इयत्ता पाचवी ते बारावी वर्गांचे पालक प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने चावडी वाचनाचा हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका श्रद्धा राजन बोडेकर यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg