खेड (प्रतिनिधी) : काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर तर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल ऍप्टीट्युड टेस्ट इन आर्किटेक्चर (एनएटीए) प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये रोटरी स्कूलच्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या १४ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करत नामांकित शासकीय महाविद्यालयातील आर्किटेक्चर कोर्सेसच्या प्रवेशासाठी पात्र होण्याचा बहुमान प्राप्त करून आपले व आपल्या शाळेचे नाव गौरवित केले आहे. नॅशनल ऍप्टीट्युड टेस्ट इन आर्किटेक्चर ही प्रवेश परीक्षा आर्किटेक्चर कोर्सेससाठी नामांकित शासकीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरिता दरवर्षी घेण्यात येते.
रोटरी शाळेच्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी यंदाही आपल्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत या परीक्षेत उत्तीर्ण होवून महाराष्ट्रातील जे. जे. महाविद्यालय, रचना सांसद यांसारख्या नामांकित शासकीय महाविद्यालयांतील आर्किटेक्चर कोर्सेसच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. एकूण २०० गुणांच्या प्रवेश परीक्षेमध्ये कोकणात प्रथम कु. सावरी जोशी (१३९ गुण), कोकणात द्वितीय कु. नील पाटणे (१३८ गुण), कोकणात तृतीय कु. श्रेयस जाधव (१३३ गुण), तसेच कु. यश राऊल (१२४ गुण), कु. आरुषी साबडे (१२० गुण), कु. पूर्वा साळवी (११९ गुण), कु. मनाल तिसेकर (११८ गुण), कु. केतकी शिर्के (११६ गुण), कु. आयेशा तिसेकर (११० गुण), कु. साहील पालवे (९८ गुण), कु. अभिषेक चव्हाण (९३ गुण), कु. सावरी बुटाला (८९ गुण), कु. जय पवार (८२ गुण) व कु. श्रवण कदम (७८ गुण) या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश असून हे विद्यार्थी नामवंत शासकीय कॉलेजमध्ये आर्किटेक्चर कोर्सेसच्या प्रवेशास पात्र ठरले आहेत.
विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एनएटीए या प्रवेश परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रा. रोहन खेडेकर, प्रा. मानसी संतोष देवघरकर, प्रा. शुभम जड्याळ, प्रा. गुरूप्रसाद देवघरकर, प्रा. स्वप्नील पंडित, प्रा. राजेश जाधव प्रा. अनिल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी (एनएटीएA) या प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.