संगमेश्वर (सत्यवान विचारे) : कसबा येथील श्रीराम मंदिर हे पौराणिक असुन कित्येक वर्ष ते दुर्लक्षित होते. हे मंदिर संगमाच्या मंदिरा शेजारी असुन ते १९८४ महापुरा फक्त गाभार्याची घुमटी वगळता मधे पूर्णतः गश्रडले गेले होते. सुमारे वीस वर्षा पुर्वी खेड तालुक्यातील कोतवली गावचे शिक्षक आणि कसबा गावचे जावई श्रीकांत बेडेकर आणि कसबा गावचे सुपुत्र बाळ काका जोशी (मध्यंतरीच्या काळात बाळ काका जोशी यांचे निधन झाले.) यांनी या मंदिरा भोवतीचे उत्तखंनं करून या मंदिराला मोकळे केले, मंदिर पूर्णतः उद्वस्त झालेले असल्याने या जोड गोळीने आपल्या स्व खर्चाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि सर्व भाविकांसाठी हे मंदिर खुले केले होते. या मंदिरात सना वाराला ग्रामस्थ्यांच्या मदतीने अणेक छोटे मोठे कार्यक्रम होऊ लागले. तर बाळ काका जोशी आणि बेडेकर गुरुजी यांनी मंदिराच्या सभा गृहात अल्प दरात लग्न, मुंज, साखरपुडा आदी कर्यक्रम सुरु केले, त्या मिळणार्या पैश्यातून मंदिराच्या परिसरश्रचे सुशोभीकरण करून अणेक सुधारणा केल्या. काही जणांची लग्न एकही पैसा न घेता स्व खर्चाने लावून दिली. अल्पवाधित या मंदिराची चर्चा पूर्ण तालुक्यात झाली.
नुकतेच या भागाला गडकलील्ले सवर्धनच्या टीमने भेट दिली होती. ते सर्वजण या मंदिरात तीन दिवस वस्तीला होते. त्यांनी श्री, संगमेश्वराच्या मंदिराचा परिसर स्वच्छ करून तेथील ढसाळलेली तटबंदी अंग मेहनतीने बांधून दिली होती (त्यांची सर्व जबाबदारी अर्थातच सरोदे, बेडेकर गुरुजी यांनी स्वीकारली होती.) त्यावेळी या टीम मधे सहभागी असलेले श्री, सदाशिव पाटील (रा, दिवा जि, ठाणा मश्रतरंडी गाव) यांना या राम मंदिरात श्री, हनुमानाची मूर्ती नसल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत श्रीकांत बेडेकर यांच्या कडे चौकशी केली असता श्री, हनुमानाची मुर्ती चोरीला गेल्याचे समजले. श्री, प्रभरामचंद्रश्रच्या मंदिरात पवन पुत्र हनुमानाची मूर्ती नसल्याचे समजताच श्री, पाटील यांनी स्वखर्चाने श्री, हनुमानाची छोटीशी मात्र सुबक देखणी अशी मूर्ती आणून ती बेडेकर गुरुजी यांच्या कडे सुपूर्द केली असता, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम मंदिरात त्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करणेत आली. श्री, सदाशिव पाटील यांनी या मंदिरासाठी साक्षात हनुमानाची मूर्ती दिल्याने या मंदिराला खर्या अर्थाने पूर्णतःवं लाभले हे जाणून श्री प्रभु राम जन्माचे औचित्य साधूत या मंदिराचे विश्वस्थ श्री, बेडेकर आणि कसबा ग्रामस्थ यांनी श्री, पाटील यांचा सत्कार केला आणि त्यांना धन्यवाद दिले, जेणे करून प्रभु रामचंद्र यांनीच सदाशिव पाटील यांना प्रेरणा देऊन आपल्या सेवकश्रला म्हणजे श्री हनुमंनांना बोलावून घेतले असे बोलले जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.