loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम नगर सरोदेवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री (शहर) ना. योगेशदादा रामदासभाई कदम यांनी दिली भेट

खेड (प्रतिनिधी) - श्रीराम जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री (शहर) ना.योगेशदादा रामदासभाई कदम यांनी दापोली तालुक्यातील टेटवली येथील श्रीराम नगर सरोदे वाडी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देऊन विधानसभा निवडणुकीमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच उपस्थित महिला वर्गांना बचत गटाच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पद्मश्री दादा इदाते, तहसीलदार अर्चना बोम्बे मॅडम, नायब तहसीलदार शरद अरमुटे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश शेठ, तालुकायुवा अधिकारी सुमित जाधव, आप्पा आयरे, श्रीराम नगर टेटवलीचे अध्यक्ष धनराज यादव, श्रीराम संस्कार केंद्र टेटवलीचे अध्यक्ष गणपत क्षीरसागर, सीतामाई महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता भारदे, शंकर भारदे गुरुजी, पोलीस पाटील आतिश भागवत, दत्तात्रय क्षीरसागर, पुजारी ह.भ.प. रमेश भागवत आदींसह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg