मुंबई - पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या रत्नागिरी जिल्हयाच्या सागरी किनार्यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेतर्ंगत रत्नागिरीच्या समुद्रकिनारी ६ ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट बांधण्यात येणार आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे ९ युनिट आणि चेजिंग रुमच्या एकूण ९ युनिट करिता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच मांडवी बिच येथे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या स्वखर्चाकून सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिट बांधण्यात येत असून या युनिटचे उदघाटन कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी होणार आहे.
कोकणातील विकास कामांची गती वाढविण्यासाठी व ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटची मागणी भाजपाच्या महिला मोर्च्याच्या दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. रत्नागिरीच्या समुद्रकिनारी भाट्ये बिच, (रत्नागिरी) गणपतीपुळे बिच, (रत्नागिरी) गणेशगुळे बिच, (रत्नागिरी), वळणेश्वर बिच (ता.गुहागर), लाडघर बिच (ता.दापोली) व मुरुड बिच (ता.दापोली) या ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर युनिट आणि चेजिंग रुम युनिट बांधण्यात येणार आहे. तसेच मांडवी बीच येथे बांधण्यात येणारे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट युनिट हे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या स्वखर्चाने बांधण्यात येत आहे. या युनिटचे उदघाटन येत्या ९ एप्रिल होणार आहे. तसेच अन्य ६ ठिकाणच्या सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे १३ युनिट आणि चेजिंग रुमच्या एकूण १३ युनिट करिता कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. या ९ युनिट करिता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या युनिटच्या मंजुरीसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांचेही सहकार्य लाभले.
कोकणाच्या समुद्रकिनारी पर्यटनासाठी दरदिवशी हजारो आबालवृध्द पर्यटक महाराष्ट्रातून येत असतात, परंतु या पर्यटकांसाठी किना-यावर जवळपास शौचालय वा चेंजिगरुमची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची गैरसोय व्हायची. पर्यटकांची ही गैरसोय दुर व्हावी व पर्यटकांना चांगली सोयी सुविधा मिळाली या दृष्टीकोनातून या समुद्र किनारी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट असावे अशी संकल्पना भाजपाच्या महिला मोर्चाच्या दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी मांडली. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे त्याअनुषंगाने त्यांनी इको टॉयलेटची मागणी केली. रविंद्र चव्हाण यांनी यांसदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे प्रयत्न केल्यानंतर मंत्री गोरे यांनी तात्काळ रत्नागिरी समुद्रकिनारच्या ६ ठिकाणच्या सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे १३ युनिट आणि चेंजिग रुमच्या १३ युनिटसाठी मंजुरी दिली व ५ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोकणातील विकास कामांची गती वाढविण्यासाठी व ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकिनारी येणा-या पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटची बांधण्याची मागणी भाजपाच्या महिला मोर्चाच्या दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सचिव परशुराम ढेकणे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. रत्नागिरीच्या समुद्रकिनारी भाट्ये बिच, (रत्नागिरी) गणपतीपुळे बिच, (रत्नागिरी) गणेशगुळे बिच, (रत्नागिरी), वळणेश्वर बिच (ता.गुहागर), लाडघर बिच (ता.दापोली) व मुरुड बिच (ता.दापोली) या ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर युनिट आणि चेजिंग रुम युनिटच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून त्याचेही काम लवकरच सुरु येणार आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.