वरवेली (गणेश किर्वे)- भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, तवसाळ गावचे सुपुत्र, श्री निलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कोतळूक ग्रामदेवता श्री झोलाई व श्री वाघजाई देवीच्या पालख्यांचे सहाणेवर आगमन याचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित कोतळूक ग्रामदेवता सहाणेसमोर गुहागर तालुकास्तरीय मातीवरील साखळी पद्धतीच्या कबड्डी स्पर्धेतील विजेत्या तृप्तीनगर अडूर संघास रोख रक्कम १० हजार व चषक म्हणून गदा, उपविजेता श्रीराम दत्त सेवा आरे संघास रोख रक्कम ५ हजार व चषक म्हणून गदा देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक साई श्रद्धा बाग तर चतुर्थ क्रमांक सेव्हन स्टार गुहागर यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामस्थ बापू महाडीक, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस दिनेश बागकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अडूर संघाचा प्रणय हळये याला टॉवर फॅन, पकड अमर नाटुस्कर, चढाई आरे संघाचा अविनाश शेटे यांना सन्मानित करण्यात आले तर अंतिम सामना सामनावीर प्रसन्न नार्वेकर याला पाण्याचा जार देण्यात आला. भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सुवासिनींनी औक्षण करून केक कापून व भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या दोन दिवसांमध्ये कोतळूक सरपंच प्रगती मोहिते, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, जिल्हा सरचिटणीस माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, स्पर्धेला बहुमोल सहकार्य करणारे कार्तिक कळझुणकर, झी २४ तासचे प्रणव पोळेकर, केतन पवार, जिल्हा उपाध्यक्ष, श्री दुर्गा देवी देवस्थान ट्रस्ट गुहागर अध्यक्ष किरण खरे, श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड अध्यक्ष शार्दुल भावे, कार्यवाह अमरदिप परचुरे, भाजपा गुहागर विधानसभा संयोजक सतीश मोरे, देवखेरकी उपसरपंच गणेश हळदे, महेश तटकरे, भाजपा गुहागर तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, उदमेवाडी अध्यक्ष समीर ओक, उपाध्यक्ष नरेश बागकर आदींसह बहुसंख्येने मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. स्पर्धा निरीक्षक पराग भोसले, पंच प्रमुख समीद घाणेकर यांनी काम पाहिले तर समालोचन दिपक देवकर, साई दाभोळकर, सुयोग आरेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजा हिंदुस्थानी मंडळातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.