loader
Breaking News
Breaking News
Foto

उंबर्ले ओळगावात मोफत कचरा कुंडयाचे वाटप ---

दापोली (शशिकांत राऊत) - उंबर्ले आणि ओळगावात स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन गावातील प्रत्येक कुटुंबांना ग्राम पंचायतीच्या वतीने मोफत कचरा कुंडयाचे वाटप करण्यात आले. दापोली तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणा-या उंबर्ले ओळगाव या ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने उंबर्ले आणि ओळगाव या दोन महसुली गावातील तब्बल ४२५ कुटुंबांना मोफत कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. हा मोफत कचरा कुंडीचा वाटप सोहळा उंबर्ले-ओळगाव ग्रुप ग्राम पंचायतीचे सरपंच नरेंद्र मांडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपसरपंच अक्षता आग्रे, ग्रा.पं.सदस्या प्रेरणा मांजरेकर, रविना काष्टे, ओळगाव गावाचे अध्यक्ष सुरेश कासेकर, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती मेहेंदळे, ग्रामपंचायत कर्मचारी रेश्मा काष्टे तसेच गिरीश झाटे, शंकर शिगवण, साक्षी वतारी, कमलाकर झाटे, बाळकृष्ण झाटे, हरिष कासेकर, लक्ष्मण मांजरेकर आदींसह लाभधारक तसेच उंबर्ले ओळगावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्राम पंचायतीने आपल्या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील गाव वाड्यांमधील रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक स्वच्छतेचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबापासून सुरूवात केली आहे. ग्राम पंचायतीने ग्राम पंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून ४२५ कचरा कुंडया खरेदी करून स्वच्छतेसाठी उंबर्ले ओळगावातील सर्व कुटुंबांना कचरा कुंडयाचे मोफत वाटप करून ख-या अर्थाने स्वच्छतेच्या जनजागृतीचा संदेश दिला आहे. यावेळी सरपंच नरेंद्र मांडवकर यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्व सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg