loader
Breaking News
Breaking News
Foto

खवटी गावचे सुपुत्र नरेश दळवी वसई भूषण पुरस्काराने सन्मानित ---

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील खवटी गावचे भूमीपुत्र; २०१८ चे महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक व २०१९ चे महाराष्ट्र राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार पटकावणारे नरेश चंद्रप्रभा भिकाजी दळवी यांना वसई येथील वर्तक वेल्फेअर फाउंडेशन द्वारा ३३ यांच्यावतीने देण्यात येणार्‍या वसई भूषण पुरस्काराने कार्यक्रमाध्यक्ष, प्रमुख पाहुणे, स्थानिक न्यूयॉर्क अमेरिकेचे इंटरनॅशनल सोशल वर्कर, आंतरराष्ट्रीय डेव्हलपमेंट एक्सपर्ट डॉ. नेहाल मयूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे संपूर्ण कोकण विभागात कौतुक होत असून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वर्तक वेल्फेअर फाउंडेशन द्वारा ३३ च्या संस्थापिका सौ. अभिलाषा परिमल वर्तक असून वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी केलेल्या ३३ लोकांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, कलाकार होते. फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. अभिलाषा परिमल वर्तक यांनी असं म्हटलं की, अनेक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप बसणं फार गरजेचं असतं त्यामुळे अजून जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. यावेळी डॉ. नंदन मराठे स्पाईन स्पेशलिस्ट, गोल्ड मेडलिस्ट रितेश वेदपाठक, गजेंद्र गावंडर इन्वेस्टीगेशन ऑफिसर एअर इंडिया, सविता जाऊखेडेकर उद्योजिका, मनीष वर्तक: माजी नगर सेवक, संदेश वर्तक ऋतू टूर्स अँड ट्रॅव्हल्स व सामाजिक कार्यकर्ते आणि मारुती झुंजूरके कामगार नेते आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg