loader
Breaking News
Breaking News
Foto

शरद पवार गटाचे अजित पवार पोलिसांच्या ताब्यात

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अजित पवार (उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे) यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात पाच कोटी खंडणी मागितल्याची तक्रार केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार जयकुमार गोरे यांनी ही तक्रार पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात दाखल केली होतीय. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना सीडीआरमध्ये अजित पवार यांचे कॉल डिटेल्स सापडले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अजित पवार यांना ताब्यात घेतले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. अजित पवार हे दहिवडी कॉलेजच्या महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे पाणी फाउंडेशनमध्येही सक्रिय सहभाग असतो.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा छळ केला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपानंतर गोरे अडचणीत आले होते. त्यानंतर गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg