loader
Breaking News
Breaking News
Foto

नमन कलाकार कृष्णा राडये यांना लोककला गौरव भूषण पुरस्कार प्रदान ---

लांजा(वार्ताहर)- तालुक्यातील कुवे गावातील नमन कलाकार कृष्णा राडये यांना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोककला गौरव भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री सत्यनारायण उत्साही नमन मंडळ कुवे मधली उगवतवाडी या मंडळातून कृष्णा कानू राडये यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून नमन कलाकार म्हणून सुरुवात केली. सुरुवातीला श्रीकृष्ण, गवळण, सुदामा, विष्णू अशा विविध भूमिका त्यांनी ताकदीने साकारल्या आहेत. मुंबई येथे साहित्य संघ गिरगाव या नाट्यगृहामध्ये त्यानी आपला कार्यक्रम सादर केलेला आहे. आजही वयाच्या 55 व्या वर्षी सुद्धा ते नमन कलेमध्ये कलाकार म्हणून भूमिका करून रसिकांचे मनोरंजन करत आहेत. श्री सत्यनारायण उत्साही नाच मंडळ कुवे मधली उगवतवाडी या मंडळातूनही त्यांनी आजवर शाहीर म्हणून रसिकांची मनोरंजन करून सेवा केलेली आहे. सदालाल घराण्यातील शाहीर शांताराम रातांबकर यांचे शिष्य झाल्यानंतर त्यांनी तालुक्यामध्ये जाकडी नृत्याचे अनेक कार्यक्रम केलेले आहेत. आपल्या काव्यातून त्यानी समाजामध्ये समाज प्रबोधन, मनोरंजन करण्याचे काम केले. गेली 40 वर्ष ते नमन व जाकडी नृत्य कलेची सेवा करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कृष्णा राडये यांच्या कार्याची दखल घेत नमन लोककला रत्नागिरी जिल्हा (कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र) व लोककला मंच रत्नागिरी यांच्यावतीने त्यांना लोककला गौरव भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. नुकताच जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कृष्णा राडये यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी नमन लोककला संस्था रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पी. टी. कांबळे, उपाध्यक्ष मोहन घडशी, युयुत्सु आर्ते, जिल्हा सचिव परशुराम मासये, सदस्य रविंद्र कोटकर आदी उपस्थित होते. दरम्यान, शाहिर कृष्णा राडये यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्द त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg