loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरात ब्राऊन शुगर विक्रेता पुड्यांसह पोलिसांच्या ताब्यात ,मोठी कारवाई

रत्नागिरी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगर विकली जात असतानाच पोलीस आता या कारवाईकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत , दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अशीच एक मोठी कारवाई केली त्यानंतर आज संध्याकाळी दुसरी कारवाई यशस्वीरित्या पोलिसांनी सापळा रचून केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाचणे ते गुरुमली दरम्यान ब्राऊन शुगर विकली जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागल्याने या विक्री करणाऱ्या इसमावर बारीक लक्ष ठेवून पोलिसांनी आज सायंकाळी नंतर सापळा रचला आणि ब्राऊन शुगर विक्रेत्याला 154 ताब्यात घेतले आहे. सदर विक्रेत्यास पोलिसांनी जिल्हा पोलीस मुख्यालयात नेल्याचे समजते.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

रत्नागिरी जिल्हा पातळीवर पोलिसांनी ब्राऊन शुगर विरोधी मोहीम सुरू केली आहे. नशेचे पदार्थ ज्या ठिकाणी विकले जातात त्या सर्व ठिकाणावर पोलीस छापे टाकू लागले आहेत, मात्र अजून जिल्हा पातळीवर पोलिसांना मोठे यश आलेले नाही, मात्र शहरी भागात मोठ्या प्रमाणात झाडाझडती सुरू असून आजची मोठी कारवाई म्हटली जात आहे. त्यामुळे ब्राऊन शुगर चा सापळा आता उघड होणार आहे. पोलीस आता मुख्य आरोपीच्या शोधात असून लवकरच त्यालाही ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

दुसरी कारवाई यशस्वीरित्या पोलिसांनी सापळा रचून केली.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg