सावंतवाडी (प्रतिनिधी)- भारत देश समाजवादी आहे. तो जाती पाती मध्ये विभागला जाणार नाही. यासाठी आपण संविधानाचे चिंतन आणि मनन केले पाहिजे. संविधानाची मुल्य जोपासली पाहिजेत असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री अॅड रमाकांत खलप यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर स्मृती पुरस्कार सन्मानित करण्यात आले तेव्हा ते बोलत होते. श्रीराम वाचन मंदिर व क्रीडाभुवन सावंतवाडी यांच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक कै जयानंद मठकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कै जयानंद मठकर यांच्या नावाने आठवा पुरस्काराने माजी केंद्रीय मंत्री अॅड रमाकांत खलप यांना अॅड दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कै.प्रा पांडुरंग येजरे कार्यकर्ता पुरस्कार संजय वेतुरेकर तर कै. प्राचार्य अल्ताफ खान उत्तम वाचक पुरस्कार डॉ शरयु आसोलकर यांना देऊन अॅड दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री अॅड रमाकांत खलप, माजी नगराध्यक्ष अॅड दिलीप नार्वेकर, लेखक प्रा. प्रवीण बांदेकर, श्रीराम वाचन मंदिर अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, शिक्षक भारती संघटनेचे संजय वेतुरेकर, कवयित्री शरयु आसोलकर आदी उपस्थित होते. यावेळी अॅड रमाकांत खलप म्हणाले, श्रीराम वाचन मंदिर मध्ये आलो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै, प्रा मधू दंडवते, जयानंद मठकर सह थोरा मोठ्यांना ऐकण्याची संधी मिळाली. परंतु आज समाजवाद म्हणजे जातीय समजले जाते. संविधानाने दिलेले मुल्य जोपासली पाहिजे. प्रत्येकजण भारतीय आहे हे शिक्षण संविधानातून मिळते. माजी आमदार जयानंद मठकर यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना त्यांनी उंची गाठली होती त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा अनमोल ठेवा आहे. बॅरिस्टर नाथ पै, प्रा मधू दंडवते, जयानंद मठकर यांच्या सोबत बसण्याचे मला भाग्य लाभले. अॅड रमाकांत खलप म्हणाले, न्यायाधीशाच्या घरात आग लागून नोटा जळलेल्या आढळून येतात, कुठे न्यायव्यवस्था जाते आहे, ही चिंतेची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयात जागतिक स्तरावरील कायद्याचं विचारमंथन होते. संविधानाची निर्मिती आणि भारतीय घटनेचे चिंतन, मनन केले पाहिजे. ज्यांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळाले ते वाया जाऊ नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे. भारत देश समाजवादी देश आहे. तो जाती वरून ओळखला जाणारा नाही. अन्याया विरोधात भांडत राहू. भारत देश सार्वोभोम होईल अशी वाटचाल करत राहुयात. प्रास्ताविक प्रा प्रवीण बांदेकर यांनी तर ओळख अॅड संदीप निंबाळकर यांनी करून दिली. तर प्रा सुमेधा नाईक यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, डॉ जी ए बुवा, डॉ जयेंद्र परुळेकर, अॅड सुभाष पणदूरकर, बाबुराव धुरी,सतीश लळीत, प्रा तुषार भाग्यवंत, विनया बाड, डॉ सौ. सई लळीत, समीर वंजारी, डॉ विजयालक्ष्मी चिंडक, अभिनेता नंदू पाटील, बाळ बोर्डेकर, कवयित्री कल्पना बांदेकर, मिलिंद मठकर, सिमा मठकर, भरत गावडे, मिहीर मठकर, मेहबूब मेहनतुल्ले आदी उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.