loader
Breaking News
Breaking News
Foto

नर्सिंग अभ्यासक्रमाच्या  २३ विद्यार्थ्यांची ३३ लाखांची फसवणूक :  उडाण स्कील इन्स्टिट्यूट  संस्थेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

३ विद्यार्थ्यांची ३३ लाखांची फसवणूक :  उडाण स्कील इन्स्टिट्यूट  संस्थेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल* ठाणे दि.७ (प्रतिनिधी )  :  समाजमाध्यमावर उडाण स्कील इन्स्टिट्यूट या संस्थेची जाहिरात प्रसिद्ध करून  या संस्थेत परिचारिका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन  हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असल्याचे भासवून विद्यार्थ्यांकडून संस्थेने लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क आकारून  नर्सिंग (परिचारिका) अभ्यासक्रमाच्या नावाखाली २३ विद्यार्थ्यांची ३३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उडाण स्कील इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, इयत्ता १२ वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थांनी विविध अभ्यासक्रमासाठी शोध सुरु केला होता. समाजमाध्यमावर उडाण स्कील इन्स्टिट्यूट या संस्थेची जाहिरात प्रसिद्ध करून या संस्थेत परिचारिका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले होते त्यावेळी विध्यार्थ्यानी  मे २०२४ मध्ये विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची परिक्षा दिली. या परिक्षेचा निकाल डिसेंबर २०२४ मध्ये लागणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना परिक्षेचा निकाल हाती मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत संस्थेच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोदंणीसाठी २० हजार रुपये लागतील असे सांगितले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी २० हजार रुपये संस्थेतील अधिकारी सौरभ याच्या बँक खात्यात जमा केले. परंतु त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. याबबत विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना निकालपत्र दिली नाही. तसेच विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र देखील परत केलेली नाहीत.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

एकूण २३ विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली असून त्यांची ३३ लाख १७ हजार ८५० रुपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी उडाण स्कील इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल असून तपास सुरु आहे अदयाप संस्थेच्या कोणालाही अटक केलेली नसल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाजन यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg