नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच मोठ्या प्रमाणात रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक बाजारपेठेत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घोषणेनंतर गुंतवणूकदारांनी धोका टाळण्यासाठी सुरक्षित पर्यायांचा (Safe Haven Assets) शोध घेणे सुरू केले असून, यात सर्वात जास्त मागणी जपानी येन, स्विस फ्रँक आणि सोन्याची होत आहे. Absolute Strategy Research चे प्रमुख अब्राहिम रहबारी यांच्या मते, अमेरिकी मंदी आणि व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानी येन हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरू शकतो. ते म्हणाले की, येन अजूनही तुलनेत स्वस्त आहे.अमेरिकन व्याजदर कमी झाल्याने येन आणि डॉलर यांच्यातील व्याजदर फरक कमी होईल. जपान आता व्यापारावर पूर्वीइतका अवलंबून नाही आणि तिथल्या सरकारच्या आर्थिक धोरणातही नरमाई आहे. आकडेवारीनुसार 2 एप्रिलपासून येनने डॉलरच्या तुलनेत 3% पर्यंत मजबुती दर्शवली आहे.
रहबारी यांनी स्विस फ्रँकलाही चांगला पर्याय असे म्हटले आहे. सध्या स्विस फ्रँक 3% पेक्षा अधिक वधारला असून डॉलरच्या तुलनेत 0.8522 या स्तरावर पोहोचला आहे. Raymond James Investment Management चे मॅट ऑर्टन यांच्या मते, सध्याच्या अनिश्चित वातावरणात स्विस फ्रँक येनपेक्षा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.त्याचवेळी सोन्याकडे 'सुरक्षित गुंतवणूक' म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे अशा अस्थिर काळात गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. याशिवाय केंद्रीय बँकांची खरेदी, भू-राजकीय तणाव, महागाईची चिंता आणि अमेरिकन व्याजदरात संभाव्य कपात हीही महत्त्वाची कारणं आहेत जी सोन्याच्या दरावर परिणाम करत आहेत.
टाइम्स स्पेशल
तज्ज्ञांच्या मते- वाढत्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सोनं, बाँड्स, डॉलर फ्युचर्स, तेल आणि इक्विटी इंडेक्सवरील पुट ऑप्शन्स यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे.BullionVault चे रिसर्च डायरेक्टर एड्रियन ऐश म्हणतात- कमकुवत व्यापार, वाढत्या खर्चामुळे घटणारा नफा यामुळे शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. अशा वातावरणात सोन्याला पुढेही तेजी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकन 10 वर्षांच्या बाँडची यील्ड 6% नी घटून 3.873% वर आली आहे. जपानी बाँड यील्ड 1.05% वर आली आहे. जी डिसेंबर 2024 नंतरची सर्वात नीचांकी पातळी आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.