loader
Breaking News
Breaking News
Foto

दबा धरून बसलेल्या गवा रेड्याचा हल्ला

कुडाळ तालुक्यातील शिवापुर हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यामुळे साहजिकच या भागात गवारेड्यासह इतर वन्य प्राण्यांचा उपद्रव नित्याचाच आहे. त्यातच अलीकडे जंगलांची मोठी तोड झाल्यामुळे वन्य प्राण्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे. या वन्य प्राण्यांच्या उपद्रवात अशाच प्रकारे अनेक वेळा शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत.रविवारी सकाळी विठ्ठल शिंदे आपल्या शेतावर गेले असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गवा हल्ल्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करत ते मुख्य रस्त्यावर आले. यावेळी तेथील काही नागरिकांना ते जखमी अवस्थेत दिसल्याने त्यांनी त्यांना माणगाव येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg