loader
Breaking News
Breaking News
Foto

मोर्ले गावात जंगली हत्तीच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा बळी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : जंगली हत्ती यांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन हत्ती पकड मोहीम राबवा, अशी मागणी करून देखील वन अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. हत्ती कडून पाठलाग करणे, हल्ला करणे घटना सुरू असताना मंगळवारी सकाळी आपल्या काजू बागेत जाणारे वयोवृद्ध शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस वय वर्षे ६५ यांच्यावर काजू बागेत फणस खात असलेल्या टस्कर ओंकार हत्तीने हल्ला चढवून बळी घेतला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. वन अधिकारी यांच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला आहे. आणखी किती जणांचा बळी घेणार? असा सवाल करत तातडीने हत्ती पकड मोहीम राबवा अशी मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोर्ले गावात जंगली हत्तीने हल्ला चढवून एका शेतकर्‍याचा बळी घेतला हे समजताच मोर्ले गावातील ग्रामस्थ वन अधिकारी कर्मचारी, पोलीस, राजकीय लोकप्रतिनिधी मोर्ले गावात दाखल झाले. जंगली हत्ती पकड मोहीम राबवा अशी मागणी करून देखील वन अधिकारी गांभीर्याने घेत नाही. केवळ उपाययोजना, अभ्यास दौरा नावाखाली जनतेच्या पैशाची लूट थांबवा हत्ती बंदोबस्त करा, आणखी लोकांचा बळी जाण्याची वाट बघू नका, असे संतप्त ग्रामस्थ यांनी वन अधिकारी कर्मचारी यांना सुनावले.

टाइम्स स्पेशल

गेल्या काही दिवसापासून मोर्ले गावात ओंकार टस्कर हत्ती मोर्ले गावात फिरत आहे. दिवसाढवळ्या, राञी, सकाळी काजू बागेत, फणस, काजू बोंडू खाण्यासाठी हत्ती येतो. तेव्हा वन कर्मचारी तैनात करा, अशी मागणी करून देखील वन अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करतात. लक्ष्मण यशवंत गवस सकाळी नेहमी प्रमाणे काजू बागेत फेरफटका मारण्यासाठी जात होते. यावेळी पायवाटेच्या वरच्या बाजूला टस्कर हत्ती फणस खात होता. लक्ष्मण गवस नजरेस पडतात पाठलाग करत बांबू बेटातून पुढे फेकून दिले. सोंडेने हात मोडला नंतर पाय ठेवला यामुळे टस्कर हत्ती हल्ल्यात गवस यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मोर्ले गावात परिसरात खळबळ उडाली आहे असून ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg